जॉर्ज सोरोस यांना वाटते की, जग त्यांच्या विचारांनुसार चालते ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रत्युत्तर

जॉर्ज सोरोस यांना जयशंकर यांचे प्रत्युत्तर

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – जॉर्ज सोरोस ही न्यूयॉर्कमध्ये बसलेली वृद्ध, श्रीमंत आणि हट्टी व्यक्ती आहे. सोरोस यांना असे वाटते की, जग त्यांच्या विचारांनुसार चालते. अशा व्यक्ती नकारात्मकता पसरवण्यासाठी सर्व साधनांचा वापर करत आहेत, असे प्रत्युत्तर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्.जयशंकर यांनी येथे एका मुलाखतीत बोलतांना दिले.

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी ‘भारतातील उद्योगपती अदानी यांच्यावर आरोपांच्या प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागेल’, असे विधान केले होते.