शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

मडगाव, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या २० फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे. शिक्षण खात्याने योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला उपस्थिती लावण्यासंबंधीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, ‘‘योग शिबिराला उपस्थिती लावण्याचे बंधन सरकार घालू शकत नाही. सरकारच्या या आदेशामुळे २० फेब्रुवारीला शाळेचे नियमित वर्ग घेतले न जाण्याची शक्यता आहे.’’