भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या मिसिसोंगा येथील श्रीराम मंदिरात १४ फेब्रुवारीला तोडफोड करून तेथे भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमागे खलिस्तानी असल्याचे म्हटले जात आहे. मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेचा टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने निषेध केला आहे. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
राम मंदिर पर लिखे भारत विरोधी नारे, PM मोदी के खिलाफ उगला जहर: कनाडा में एक और हिंदू मंदिर खालिस्तानी घृणा का बना शिकार#Canada #RamMandir https://t.co/f43cPERRBj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 15, 2023
१. कॅनडामध्ये याआधी जानेवारीमध्ये ब्राम्प्टन येथील गौरीशंकर मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. त्यानंतर तेथील स्थानिक हिंदु नागरिकांसह भारताच्या वाणिज्य दूतावासाने संताप व्यक्त करतांना, ‘या घटनेमुळे कॅनडामध्ये रहाणार्या हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत’, असे म्हणत चौकशीची मागणी केली होती.
२. सप्टेंबर २०२२ मध्ये कॅनडामधील श्री स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. या सर्व घटनांमध्ये खलिस्तान समर्थकांवर आरोप होत आहे. जुलै २०२२ मध्ये देखील ग्रेटर टोरंटो परिसरातील रिचमंड हिल येथील हिंदु मंदिरातील महात्मा गांधी यांची मूर्ती फोडण्यात आली होती.
(सौजन्य : Republic World)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाकॅनडामध्ये खलिस्तान्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला तेथील सरकारचे अभय आहे. याकडे आता भारत सरकारला विशेष लक्ष देऊन अशा घटना रोखण्यासाठी आणि खलिस्तानवाद्यांवर लगाम लावण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील ! |