शिवालयात पूजा करतांनाच्या छायाचित्रांमुळे अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी मुसलमानांना पोटशूळ !

मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांची मुलगी आणि चित्रपट अभिनेत्री सारा अली खान हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे धडे देणारे गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासारखे मुसलमान अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा ! महाशिवरात्रीच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित केली आहे. यामध्ये त्या एका शिवालयात पूजा करत असल्याची, तसेच ध्यानमग्न असल्याची छायाचित्रे असून त्याखाली ‘जय भोलेनाथ’ अशी छायाओळ लिहिली आहे. अनेक मुसलमानांकडून यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

१. एका मुसलमानाने लिहिले की, कोण म्हणते की ही मुसलमान आहे ? ‘शिर्क’ (मूर्तीपूजा) करणार्‍यांना अल्लाह क्षमा करत नाही. हिचे केवळ नाव मुसलमानांचे आहे !

२. सितारा नावाच्या व्यक्तीने लिहिले की, जी आपली धर्म मानत नाही, ती कुणाची असेल !

३. सय्यद शिफा नावाच्या व्यक्तीने सारा अली खान यांना ‘नरकासमान महिला’ संबोधिले आहे.

४. अलमन अन्सारी या व्यक्तीने म्हटले की, तू काफिर असून तुला मुसलमान नाव चांगले वाटत नाही.

५. फहाद नावाच्या व्यक्तीने लिहिले की, अल्लाखेरीज कुणी उपासना करण्याच्या पात्रतेचे नाही. मूर्तीपूजा हराम आहे आणि हरामच राहील.

एकही मुसलमान सारा अली खान यांचे कौतुक करत नाही ! – एका हिंदूची सूचक प्रतिक्रिया

दुसरीकडे शिवम मिश्रा नावाच्या एका हिंदूने लिहिले की, एकही मुसलमान सारा अली खान यांचे कौतुक करत नाही. यातून दिसते की, हे सर्वांना समान समजत नाहीत. हे इतर धर्मियांना ‘काफिर’ समजतात. धर्मनिरपेक्षतेसारखी कोणती गोष्ट नाही. यांना (मुसलमानांना) कुणीही शिक्षण देऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका 

हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे धडे देणारे गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासारखे मुसलमान अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !