डोनाल्ड ट्रम्प अणूबॉम्बद्वारे आक्रमणाचा आदेश देऊ शकतात ! – विरोधी पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना संशय

ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्‍चर्य वाटायला नको !

डावीकडे नॅन्सी पेलोसी आणि डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या संसदेवर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर विरोधी पक्षाच्या नेत्या आणि सभापती नॅन्सी  पेलोसी यांनी, ‘ट्रम्प एक धोकादायक व्यक्ती आहेत.

सत्तेच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प अणूबॉम्बच्या आक्रमणाचा आदेश देऊ शकतात’, असा संशय व्यक्त केला आहे. असे होऊ नये, यासाठी पेलोसी यांनी अमेरिकेचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ यांची भेट घेतली. राजकीय तज्ञांनी मात्र ट्रम्प असे वर्तन करू शकण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.