दगडफेक करणार्‍या आरोपींना दांडक्याने मारणे, हा छळ मानण्यात येऊ नये !  – गुजरात पोलीस

गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गेल्या वर्षी काही मुसलमानांना दगडफेक केल्याच्या प्रकरणी पकडून त्यांच्या पार्श्‍वभागावर दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. ‘या मारहाणीच्या घटनेला छळ म्हणण्यात येऊ नये’, असे या प्रकरणातील ४ पोलीस अधिकार्‍यांनी गुजरात उच्च न्यायालयात म्हटले.

खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या २ साथीदारांना देहलीत अटक

देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या  जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.

मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !

पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधून घेतले आदि कैलास पर्वताचे दर्शन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागड येथील आदी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. येथेच पार्वती कुंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे पूजा केली. येथून चीनची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर आहे.

Pejawar Swamiji : अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात.

गोव्यातील खाण घोटाळ्याचे अन्वेषण करण्यास विशेष अन्वेषण पथकाला संमती

खाण घोटाळ्याचे अन्वेषण तब्बल १० वर्षे कासवाच्या गतीने चालू रहाणे लज्जास्पद !

शाही ईदगाहच्या ठिकाणी असणार्‍या श्रीकृष्णजन्मभूमीला मान्यता देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

मथुरा येथील शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी असणार्‍या श्रीकृष्णजन्मभूमीला मान्यता देण्याची मागणी करणारी जनहित याचिका प्रयागराज उच्च न्यायालयाने फेटाळली.

‘पी.एफ्.आय.’च्या संशयित सदस्याने ‘एन्.आय.ए.’च्या पथकाला ३ घंटे ठेवले ताटकळत !

३ घंटे दरवाजा उघडला नाही, तर पोलिसांनी दरवाजा तोडला का नाही ?

हमासचे आक्रमण ही पॅलेस्टाईनवरील अत्याचारांवरील प्रतिक्रिया !-‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे समर्थन

भारतात जिहादी आतंकवादी आक्रमण करून हिंदूंना ठार मारणार्‍या पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्याची मागणी या बोर्डाने किंवा अन्य एकाही मुसलमान संघटनेने कधी केलेली नाही.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षांवर उपोषण करत असल्याने नोंदवला आत्महत्येचा प्रयत्नाचा गुुन्हा !

काँग्रेस सरकारला निवडून देणार्‍या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?