मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

इंफाळ (मणीपूर) – केंद्रशासनाने मणीपूरला लागून असलेल्या म्यानमारच्या सीमेवर १०० किलोमीटर लांबीचे कुंपण घालण्याची योजना आखाली आहे. हे कुंपण यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे कुंपण म्यानमारला लागून असणार्‍या अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांच्या सीमेवरही घालण्यात येणार आहे. मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारस्थित आतंकवादी संघटना आणि अंमली पदार्थांचे तस्कर सहभागी आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या कारवाया सीमेवर विशेषत: मोरेह भागात असतात. म्यानमारच्या सीमेवर दोन्ही बाजूंनी १५ किमीपर्यंत मुक्त संचाराची सुविधा आहे. ही सुविधाही रहित करण्यात येणार आहे.

सौजन्य न्यूज 9 लाईव्ह 

संपादकीय भूमिका 

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !