कर्नाटकातील काँग्रेस सरकारची दडपशाही !
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘राष्ट्र रक्षणा पडे’चे अध्यक्ष पुनीत केरेहल्ली यांच्याविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत आत्महत्येचा प्रयत्न आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, असे गुन्हे नोंदवले. गुंडा कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवल्याने केरेहल्ली येथील स्वातंत्र्य उद्यानात उपोषण करत असतांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांना बलपूर्वक रुग्णालयात भरती केले आहे. ‘केरेहल्ली यांनी उपोषण केल्याने त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे’, असे पोलिसांनी सांगितले. ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु संघटना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांसमोर पुनीत केरेहल्ली यांनी ‘सरकारी बसला आग लावेन आणि विधानसभेवर दगडफेक करीन’, असे कथित विधान केल्यावरून त्यांच्यावर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
यापूर्वी केरेहल्ली यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. त्या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुंडा कायद्याअंतर्गत अटकेसाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे सांगत केरेहल्ली यांची सुटका करण्याचा आदेश दिला होता.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकारला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ? |