‘पी.एफ्.आय.’च्या संशयित सदस्याने ‘एन्.आय.ए.’च्या पथकाला ३ घंटे ठेवले ताटकळत !

धाडीच्या वेळी दरवाजा उघडण्यास नकार !

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (‘पी.एफ्.आय.’चा) संशयित सदस्य वाहिद शेख याच्या विक्रोळी येथील घरावर ११ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धाड घातली. या वेळी शेख याच्या कुटुंबियांनी घराचा दरवाजा उघडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ‘एन्.आय.ए.’च्या पथकाला जवळपास ३ घंटे घराबाहेरच ताटकळत उभे रहावे लागले. वाहिद शेख याला वर्ष २००७ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती; पण वर्ष २०१५ मध्ये त्याची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली.

या वेळी शेख याने ‘एन्.आय.ए.’च्या अधिकार्‍यांवर धाडीची नोटीस न दाखवण्याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • ३ घंटे दरवाजा उघडला नाही, तर पोलिसांनी दरवाजा तोडला का नाही ?