पार्वती कुंड येथे केली पूजा !
पिथौरागढ (उत्तराखंड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागड येथील आदी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. येथेच पार्वती कुंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे पूजा केली. येथून चीनची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर आहे. उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील आदी कैलास पर्वताला भेट देणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. पिथौरागड जिल्ह्यातील १८ सहस्र फूट उंच लिपुलेख पर्वतावरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. येथून पर्वताचे हवाई अंतर ५० किलोमीटर आहे. पंतप्रधान मोदी पिथौरागड जिल्ह्यात अनुमाने ४ सहस्र २०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
सौजन्य द इकनॉमिक्स टाइम्स
भारतातूनच घेता येईल आदि कैलास पर्वताचे दर्शन !भारत-चीन सीमेच्या शेवटी असलेल्या जुन्या लिपुलेख भागातून आदि कैलास पर्वत पहायला मिळतो. आतापर्यंत प्रवाशांना आदि कैलासला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून व्हिसा घ्यावा लागत होता आणि धारचुला मार्गे चीनला जावे लागत होते; परंतु आता ते जुन्या लिपुलेखमधूनच आदि कैलास पर्वताचे दर्शन घेऊ शकणार आहेत. |