मिरज येथे १०० फुटी तिरंगा ध्वजाचे अनावरण !

मिरज येथे उभारण्यात आलेला १०० फुटी तिरंगा ध्वज
मिरज येथे उभारण्यात आलेली तंतूवाद्य प्रतीकृती

मिरज – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील पहिला १०० फुटी तिरंगा ध्वज आणि तंतूवाद्य प्रतीकृती (सतार आणि तंबोरा) यांचे लोकार्पण १५ ऑगस्ट या दिवशी पार पडले. या प्रसंगी कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जयंत पाटील, नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक सुरेश आवटी, मनोज शिंदे यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.