कराड येथील युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’ संपन्न !

तिरंगा रॅलीच्या प्रारंभी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतांना उपस्थित मान्यवर

कराड १९ ऑगस्ट (वार्ता.) –  येथील ‘युवा विकास प्रतिष्ठान’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट या दिवशी ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा प्रारंभ दत्त चौक येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

भारतमातेचे पूजन करते वेळी उपस्थित महिला

ही तिरंगा रॅली दत्त चौक, आझाद चौक, मेनरोड मार्गे ‘भारतमाता की जय !, वन्दे मातरम् ! या घोषणा देत मार्गस्थ होऊन येथील चावडी चौकामध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी उपस्थित महिलांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते खेळाडू आणि ज्येष्ठ यांचा सन्मान करण्यात आला.

तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी नागरिक

शेवटी सामूहिक राष्ट्रगीत पठण करण्यात आले. या वेळी युवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विष्णु पाटसकर यांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, नगरसेवक, हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी, खेळाडू, विद्यार्थी वर्ग, महिला आणि राष्ट्रप्रेमी नागरिक तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते.