निकिता तोमर हत्याकांडाच्या प्रकरणी दोघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा

हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

राज्याच्या अपयशाविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवा !

त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.

अशा घटना कधी थांबणार ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला !

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाकमध्ये हिंदु मुलींच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदु पत्रकाराची हत्या !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?

विदिशा (मध्यप्रदेश) येथे धर्मांध वन माफियांकडून त्यांची तक्रार करणार्‍या हिंदूची ट्रक्टरखाली चिरडून हत्या !

भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून राज्यातील सर्वच वन माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !

बाळ बोठे यांची बडदास्त ठेवली जात आहे ! – रूणाल जरे यांचा आरोप

आरोपीला मदत करण्यापर्यंत पोलिसांची मजल कशी जाते ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास नवल काय ? याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे, असेच सर्वसामान्यांना वाटेल !