
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी येथील औरंगा टाऊन भागात जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी मौलाना तारीक रहीम उल्लाह याला गोळ्या झाडून ठार मारले. भारतविरोधी सभेमध्ये भाग घेण्यासाठी जात असतांना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तारिक हा पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध मौलाना (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) होता. त्याचे भाषण ऐकण्यासाठी सहस्रो लोकांची गर्दी व्हायची.

पाक, ब्रिटन आणि कॅनडा या देशांमधध्ये भारतविरोधी आतंकवाद्यांच्या हत्यांचे सत्रामध्ये ही २० वी हत्या असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh