मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’ करायचे आहे ! – अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी

मी ‘बॉलिवूड’मधील ३ गोष्टी पालटू इच्छितो. प्रथम मी ‘बॉलिवूड’चे नाव पालटून ‘हिंदी चित्रपटसृष्टी’, असे ठेवीन. दुसरे म्हणजे चित्रपटाच्या ‘सेट’वर रोमन लिपीमध्ये कलाकारांना संहिता (स्क्रिप्ट) दिली जात, मी ती संहिता देवनागरी लिपीमध्ये मागतो.

दंड रहित करण्याच्या मंत्रीमंडळाचा निर्णयाला किरीट सोमय्या यांचे न्यायालयात आव्हान !

ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन !

उत्तरप्रदेशमध्ये ११ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ सहस्रांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्री हनुमानाविषयी अश्लाघ्य वक्तव्य करत असलेला व्हिडिओ प्रसारित !

धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !

शरद पवार आणि राजीव गांधी यांची लकडावाला यांच्यासमवेतची छायाचित्रे प्रसारित !

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युसूफ लकडावाला यांच्या समवेतची छायाचित्रे ‘ट्विटर’वरून प्रसारित केली आहेत.

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी !

भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई येथे बलात्काराचा, तसेच महिलेला धमकवल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटक टाळण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता.

खासदार नवनीत राणा यांचे आतंकवादी दाऊदशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला याच्याशी आर्थिक संबंध !

राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्तीचा महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न !