शरद पवार आणि राजीव गांधी यांची लकडावाला यांच्यासमवेतची छायाचित्रे प्रसारित !

मुंबई – भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युसूफ लकडावाला यांच्या समवेतची छायाचित्रे ‘ट्विटर’वरून प्रसारित केली आहेत. यासमवेत ‘संजय राऊत यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?’, अशी विचारणा कंबोज यांनी २६ एप्रिल या दिवशी केली आहे.

या छायाचित्रासमवेत ‘राजीव गांधी आणि शरद पवार यांचे लकडावाला अन् दाऊद यांच्यासमवेत काय संबंध आहेत ?’, असे लिखाण कंबोज यांनी केले आहे. संजय राऊत यांनी युसूफ लकडावाला हा कुख्यात आतंकवादी दाऊद याचा आर्थिक पुरवठादार असल्याचे नमूद करत खासदार नवनीत राणा यांनी त्याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे, तसेच राऊत यांनी याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने अन्वेषण करण्याचे आवाहन केले आहे. याला कंबोज यांनी या छायाचित्रांद्वारे उत्तर दिले आहे.