राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर ४ मे या दिवशी सुनावणी !

राजद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर २ मे या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही.

लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या दरात ५० टक्के कपात

लोकलगाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या दरात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

दुर्गापूर (बंगाल) येथे विमान वादळात अडकल्याने ४० प्रवासी घायाळ

मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.

भोंग्यांविषयीची पुढील भूमिका राज ठाकरे आज मांडणार

मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.

महानगर गॅस लिमिटेडकडून सी.एन्.जी. गॅसच्या दरात वाढ !

सी.एन्.जी. गॅसच्या दरात महानगर गॅस लिमिटेडने प्रतिकिलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सी.एन्.जी. गॅसच्या प्रतिकिलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाकडून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची मालमत्ता जप्त !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर कारवाई केली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिन हिची ७ कोटी १२ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.

संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे  – कंगना राणावत

तमिळ, हिंदी या जुन्या भाषा आहेत; मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक जुनी संस्कृत भाषा आहे. कन्नड, तमिळ पासून ते गुजराती, हिंदी आदी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत.

अमेरिकेतून मुंबईत आलेले २७ किलो ड्रग्स जप्त !

अमेरिकेतून कुरियद्वारे मुंबईत ड्रग्सची तस्करी होताना मुंबई कस्टम विभागाने कारवाई केली. यात २७ किलो मरीजुआना ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी भूमी देण्याचे पत्र तिरुपती देवस्थानास सुपुर्द !

नवी मुंबईतील उलवे येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने भूमी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

देशातील पहिला जनुक कोश प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता !

देशातील पहिलाच महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प राबवण्यास २८ एप्रिल या दिवशी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.