दंड रहित करण्याच्या मंत्रीमंडळाचा निर्णयाला किरीट सोमय्या यांचे न्यायालयात आव्हान !

आमदार प्रताप सरनाईक यांना दंड ठोठावल्याचे प्रकरण

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या

मुंबई – ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे; पण या निर्णयाच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी २९ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. मंत्रीमंडळाचा हा निर्णय रहित करण्यात यावा, तसेच हा दंड प्रताप सरनाईक यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी या याचिकेत केली आहे.