ठाणे, २७ एप्रिल (वार्ता.) – भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई येथे बलात्काराचा, तसेच महिलेला धमकवल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटक टाळण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. यावर २७ एप्रिल या दिवशी ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ‘नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर २८ एप्रिल या दिवशी सुनावणी होईल’, असे सांगितले आहे.