सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची न्यायालयात माहिती !

२१ जून या दिवशी ‘एन्.आय.ए.’च्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांची ‘एन्.आय.ए.’ कोठडीची मागणी न्यायालयाने या वेळी मान्य केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अन्वेषणाला राज्य सरकारकडून असहकार्य !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या अन्वेषणाप्रकरणी राज्य सरकार सहकार्य करत नाही, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत केली सामूहिक योगासने !

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जून या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत सामूहिक योगासने केली.

कोरोना संपेपर्यंत सर्वसामान्यांसाठी मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

कोरोना संपेपर्यंत मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मुंबईतील लोकल रेल्वे कधीपासून चालू होणार ? याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले.

मुंबई जिल्हा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारीवरील अन्वेषण बंद करण्यास न्यायालयाचा नकार !

प्रथम गुन्हा नोंदवायचा आणि राजकीय परिस्थिती पालटल्यानंतर संबंधित प्रकरणाचे अन्वेषण बंद करण्याची मागणी करायची, हे पोलिसांच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍न निर्माण करणारे आहे.

मुंबईतील बोगस लसीकरणाविषयी मुंबई महानगरपालिकेचे ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ला पत्र

या पत्रामध्ये लसीचे संबंधित क्रमांक विचारण्यात आले आहेत. यामुळे ‘सिरम इन्स्टिट्यूट’कडून या लसी कुणाला पुरवण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळेल आणि त्यावरून ‘लसींचा पुरवठा कुणी केला ?’, हे कळू शकेल.

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या मुंबईतील ३ मुलांचे डोळे काढले !

त्या तिघांचे वय ४, ६ आणि १४ वर्षे आहे. ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे नव्हती. १४ वर्षीय मुलीला मधुमेह असून तिची प्रकृती नाजूक आहे.

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा ! – शालेय शिक्षण विभाग

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.

मराठा समाजाचे आंदोलन स्थगित केलेले नाही ! – छत्रपती संभाजीराजे

सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सवा दोन घंटे मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते बोलत होते.

मुंबई येथे लसीकरण घोटाळा प्रकरणी ४ जणांना अटक !

लसीकरणाच्या नावाखाली ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’तील नागरिक आणि ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ आस्थापनातील कर्मचारी यांची फसवणूक !