घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्‍यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !

पुणे महापालिकेचा ५ अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट

पूर्वी चालू केलेली सायकल योजना बंद का पडली, याचा अभ्यास महापालिकेने करणे अपेक्षित आहे.

समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कोरोना साथीच्या काळात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश !

आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व महापालिकेवर असतांना त्या पुरवू न शकणे हा अक्षम्य अपराध आहे.

बारामतीतील शासकीय आणि खासगी कार्यालये, रुग्णालये यांच्या अग्नीशमन यंत्रणेची दुरवस्था

आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणार ! – केंद्र सरकार  

‘ओटीटी’ अ‍ॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला आहे.

राज्य कुणाचे ?

नक्षलग्रस्त भागात निवडणुका झाल्या, ही चांगलीच गोष्ट झाली; मात्र त्यासाठी एवढी वर्षे जावी लागणे, हेसुद्धा विचार करायला लावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आजही अशी गावे आहेत की, जेथे लोकनियुक्त सरकार नाही, तर एकप्रकारे नक्षलवादी राज्य करतात, हे लज्जास्पद नव्हे का ?

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला जवेली खुर्द येथे ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली !

नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?

एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी

कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?