‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा !

या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्‍या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी.

‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ परिसरात फादरकडून होणार्‍या अवैध कृत्यांविषयी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जोसेफ वाझ यांच्याकडून या वारसास्थळाच्या संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर फादर हे स्थान चर्चच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकर्‍यांची फसवणूक ! वर्ष १९७५ मध्ये अ‍ॅल्युमिनिअम (BALCO) प्रकल्पासाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकर्‍यांची १२०० एकर भूमी संपादित करण्यात आली; मात्र त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी आस्थापनांना देण्यात आल्या.

घरकुलासाठी ७ लाख रुपये भरण्याचे सातारा पालिका प्रशासनाचे आदेश !

सातारा येथील मतकर कॉलनीमध्ये झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे प्राप्त व्हावीत; म्हणून ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत सातारा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ७ लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुधारित ‘कट प्रॅक्‍टिस’विरोधी कायदा त्‍वरित करा ! – हिंदु विधीज्ञ परिषद

‘कट प्रॅक्‍टिस’मुळे अंतिमतः रुग्‍णाच्‍या, म्‍हणजेच ग्राहकाच्‍या खिशावर ताण येतो. रुग्‍णांचे हितसंबंध जपले जात नाहीत. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही नुकत्‍याच दिलेल्‍या निर्णयात ही भूमिका अत्‍यंत स्‍पष्‍टपणे घेतली आहे.

धुळे येथे शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक व्हायला धुळे जिल्हा काय पाकिस्तानात आहे का ? केवळ हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे धडे देणारे आता कोणत्या बिळात लपून बसले ? पोलीस प्रशासनाने अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इंदापूर (पुणे) येथील अवैध पशूवधगृह उद़्‍ध्‍वस्‍त करावे !

ज्‍या महाराष्‍ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्‍म झाला, त्‍याच महाराष्‍ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्‍जास्‍पद आहे !

हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करा !

उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’ ग्रंथाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी हीन पातळीवर टीका केली.