बजरंग दलाची श्री तुळजाभवानीमातेच्या मंदिर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !
बुर्हाणनगर (जिल्हा अहिल्यानगर) – शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त येथील श्री तुळजाभवानीमातेच्या मंदिरात जिल्ह्यातून भाविक येतात. ‘येथील अहिंदूंंकडून ‘स्टॉल’च्या निमित्ताने महिला आणि हिंदु मुली यांची छेड काढली जाते. या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. बजरंग दलाकडे याविषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अहिंदूंंना सामुग्री अथवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘स्टॉल’ लावण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे मंदिर प्रशासनाकडे केली आहे.