रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह ९५ ठिकाणी निवेदने !

रायगडमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

रायगड – स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने ध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी श्री. सुहास गायकर, श्री. समीर शिंदे, श्री. प्रणित वारगे, श्री. अविनाश पाटील, श्री. सुहास गावंड आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेलचे तहसीलदार विजय पाटील (डावीकडून चौथे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

आतापर्यंत रायगड जिल्ह्यात १४ शासकीय कार्यालये, १४ पोलीस ठाणी, ६७ शाळांमध्ये राष्ट्रध्वाजाचा अवमान रोखण्याविषयी निवेदने देण्यात आली. ४ ठिकाणी याविषयी विषय मांडून प्रबोधन करण्यात आले.

पाली येथील गटविकास अधिकारी सौ. लता मोहिते यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी
पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

रायगड उपजिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद !

उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी त्यांची अन्य एक बैठक चालू असतांनाही समितीच्या कार्यकर्त्यांना कक्षात बोलावून घेतले. निवेदन स्वीकारून ते पूर्ण वाचले. ‘राष्ट्रध्वजाच्या सन्मानसाठी तुमचे हे कार्य अतिशय चांगले असून याविषयीचे परिपत्रक काढतो’, असे सांगितले. त्वरित शिपायाला बोलावून निवेदन गृहशाखेत देऊन परिपत्रक काढण्याचे आदेश दिले.