‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका !- रोहित पाटील, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्‍यासाठी पाल्‍यांनी त्‍यांच्‍या मुलीला संस्‍कार देऊन त्‍यांचे या जाळ्‍यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्‍येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्‍यक आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती जोपासली पाहिजे, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चे धारकरी श्री. रोहित पाटील यांनी केले.

पंचशीलनगर, दडगे प्लॉट येथील प्रार्थनास्थळाचे चालू असलेले अवैध बांधकाम बंद करा !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात पंचशीलनगर, दगडे प्लॉट येथील परिसरात महापालिकेच्या रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रार्थनास्थळाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. हे अवैध बांधकाम तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग  स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?

प्रार्थनास्थळे आणि कार्यक्रम यांतून ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्या अन्यथा कारवाई ! – फुलचंद मेंगडे, पोलीस निरीक्षक, सावंतवाडी

सर्वधर्मियांनी ध्वनीक्षेपक वापरतांना त्याच्या आवाजाचा इतरांना त्याचा त्रास होणार नाही, तसेच याविषयी कोणतीही तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या.

कुडाळ शहरात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करू पहाणार्‍या संघटनांची चौकशी करा ! – वैद्य सुविनय दामले, कुडाळ

बाळा राणे यांनी २६ जानेवारी या दिवशी घोषित केलेले आंदोलन हे त्यांचे वैयक्तिक असले, तरीही जागरूक नागरिक म्हणून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे.

गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन

मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.

प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा घालावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?

नंदुरबार येथे ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालण्‍याच्‍या मागणीसाठी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

अभिनेता शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्‍या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदु धर्मियांच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. असा चित्रपट प्रदर्शित करू नये. जर चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

मंत्र्यांनी पत्रावर दिलेल्‍या शेर्‍यावरील कार्यवाहीविषयी अधिकार्‍यांना कळवावे लागणार !

सर्वसामान्‍य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी निवेदन, पत्र दिल्‍यावर मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री, तसेच अन्‍य मंत्री त्‍यावर शेरा देतात. याविषयी गुणवत्तापूर्वक कार्यवाही करून संबंधितांना कळवण्‍यात यावे, असा आदेश महाराष्‍ट्र शासनाने दिला आहे.