विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्‍या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्‍याही परिस्‍थितीत मागे घेण्‍यात येणार नाहीत, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकार्‍यांनी शिष्‍टमंडळास दिले आहेत.

स्थानिक पातळीवरील जनता दरबार भरत नसल्याने नागरिकांची मंत्रालयात गर्दी !

सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांत जनता दरबार भरतच नाहीत. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांना थेट मुंबईत मंत्रालयात यावे लागत आहे.

दत्तक घेतलेल्या मुलांचे धर्मांतरण करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करा !  

दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

गेवराई शहरामध्‍ये चालू असलेले अनधिकृत पशूवधगृह बंद करा ! – सकल हिंदु समाज

गेवराई शहरातील निकम गल्ली घाटे फॅब्रिकेशनच्‍या मागील गोडाऊनमध्‍ये मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह तात्‍काळ बंद करण्‍यात यावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नगर परिषदेकडे देण्‍यात आले.

रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह ९५ ठिकाणी निवेदने !

स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने ध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने राष्‍ट्रध्‍वजाची होणारी विटंबना रोखण्‍यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्‍यात आले.

सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.

शिरशिंगे (सिंधुदुर्ग) येथे डोंगर खचून जीवित आणि वित्त हानी होण्यापूर्वी पुनर्वसन करा ! – ग्रामस्थांची मागणी

अशी घटना घडण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे त्वरित पुनर्वसन करा, अन्यथा दुर्घटना घडून हानी झाल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने विस्‍तृत अहवाल आणि प्रस्‍ताव राज्‍यशासनाच्‍या वतीने सादर केला आहे; मात्र तसे असूनही आजपर्यंत मराठी भाषेची उपेक्षा होत आहे