सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.

शिरशिंगे (सिंधुदुर्ग) येथे डोंगर खचून जीवित आणि वित्त हानी होण्यापूर्वी पुनर्वसन करा ! – ग्रामस्थांची मागणी

अशी घटना घडण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे त्वरित पुनर्वसन करा, अन्यथा दुर्घटना घडून हानी झाल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने विस्‍तृत अहवाल आणि प्रस्‍ताव राज्‍यशासनाच्‍या वतीने सादर केला आहे; मात्र तसे असूनही आजपर्यंत मराठी भाषेची उपेक्षा होत आहे

कात्रज (पुणे) येथील अनधिकृत ‘बीफ’ची दुकाने बंद करावीत !

अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्‍वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्‍या वरदहस्‍तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्‍काळ कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्‍ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !

शासनाने बंदी घातलेले प्‍लास्‍टिकचे ध्‍वज विक्री करणार्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करून राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्‍यात आले.

प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत.

कराड येथील प्राचीन मंदिर परिसरातील कचरा त्‍वरित हटवण्‍यात यावा ! – स्‍थानिक भक्‍तांची मागणी

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्‍यचुकारपणा करत आहे, हे वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी पहाणे आवश्‍यक !

मणीपूरमध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा लागू करा ! – ‘कोकोमी’ची पंतप्रधानांकडे मागणी

मणीपूरमधील हिंसाचारात म्यानमारमधून आलेल्या स्थलांतरितांचा हात असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !

वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.