बजरंग दलाचे निवेदन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करा !

नायब तहसीलदार नारायण मोरे (डावीकडे) यांना निवेदन देतांना बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

मिरज – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात, तसेच काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात. तरी  प्रशासनाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात दिले. हे निवेदन नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी स्वीकारले.

या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, सर्वश्री परशुराम नाईक, शुभम पाटील, वैभव सुतार, यश सुतार, प्रणव जाधवल, संकल्प शेंगणे, शंकर जाधव, संदीप नाईक, अवधूत कुलकर्णी, नामदेव नाईक यांसह अन्य उपस्थित होते.