तुर्भे येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शिवसेनेकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा !

निवेदन देतांना शिवसेनेचे कार्यकर्ते

नवी मुंबई – तुर्भे गावातील काही भाग, तसेच जनता मार्केटच्या जवळील परिसरात वेश्या व्यवसाय चालतो. या प्रकरणी शिवसेनेने ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. वेश्या व्यवसायामुळे तुर्भे गाव आणि जनता मार्केटमधील व्यापारी खरेदी करण्यासाठी येणार्‍या महिला, महाविद्यालयीन तरुणी, तसेच स्थानिक रहिवासी यांना त्रास होतो. व्यवसाय बंद व्हावा, या प्रकरणी शिवसेना उपशहरप्रमुख अतिश घरत, शिवसेना व्यापारी संघटना यांच्या वतीने ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून देहविक्री करणार्‍या महिलांवर कारवाई करून हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी अतिश सोमा घरत यांनी केली आहे. त्यावर ‘वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील आणि त्या ठिकाणी बिट चौकी २४ घंटे कार्यरत राहील’, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शिवसेना उपशहरप्रमुख अतिष घरत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संपादकीय भूमिका 

  • वेश्या व्यवसायासारख्या गंभीर सामाजिक समस्या न सोडवणारे प्रशासन जनहिताचे निर्णय कसे घेणार ?
  • मोर्चा काढण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून यावर बंदी का घालत नाहीत ?