‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

केरळ सरकारकडून सामाजिक माध्यमांवरून अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या कायद्याच्या कार्यवाहीला स्थगिती

केरळ सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मागे घेतले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘सध्या या कायद्याची कार्यवाही करण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे.

पाकमधील व्यवसाय बंद करू ! – गूगल, फेसबूक आदींची पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी

पाक सरकारने संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांवर असलेल्या लिखाणाविषयी नवे नियम लागू केले आहेत. यामुळे फेसबूक, गूगल आणि ट्विटर यांनी पाकमधील त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.

लडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशा दाखवणार्‍या ट्विटरची क्षमायाचना

ट्विटरने त्याच्या मानचित्रामध्ये लडाखला चीनचा भूभाग दाखवला होता. या प्रकरणी भारताच्या संसदीय समितीने नोटीस बजावून क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने समितीसमोर लेखी क्षमायाचना केली आहे.

(म्हणे) ‘जिवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा पुरवावी !’

पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘फेसबूक’द्वारे एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या प्रकरणी प्रा. सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी गोव्याची प्रतिमा जगासमोर सकारात्मक मांडावी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत असलेल्या तथ्यहीन आणि संदर्भहीन बातम्यांमुळे गोव्यातील पर्यटन आणि इतर व्यवसाय यांवर विपरीत परिणाम होत आहे.

सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांवर बनावट फोलोअर्स वाढवल्याप्रकरणी गायक बादशहा यांची पोलिसांकडून चौकशी

इन्स्टाग्रामवर ६ लाख चाहते असलेले गायक आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया तथा बादशहा यांची ६ ऑगस्ट या दिवशी गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने चौकशी केली.

उद्दामपणा आणि समाजद्रोहही !

कोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस !

कोरोनाला अटकाव करण्यासाठी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशामध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात यावे…..

प्रसिद्धी आणि समाजभान !

सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अन् जनता प्रयत्न करत आहेत. शासनाकडून समाजभान राखण्यासाठी वारंवार आवाहन केले जात असून समाजातील विविध क्षेत्रांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.