उद्दामपणा आणि समाजद्रोहही !

संपादकीय

कोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले. त्याला  नागरिकांनी प्रतिसाद दिला. पुढे २१ दिवस दळणवळण बंदी घोषित करण्यात आली. ‘कोरोनाचे संकट दूर व्हावे’, अशी मनोकामना करणार्‍या देशवासियांनी ही आवश्यक असणारी बंधनेही स्वीकारली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीचे ‘युद्धजन्य परिस्थिती’ अशा शब्दांत वर्णन केले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे आणि अद्याप त्यावर ठोस औषधोपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये; म्हणून आवश्यक ती काळजी घेणे, शासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. असे असतांना समाजातील धर्मांध मात्र सरकारी नियम पाळण्याच्या सिद्धतेत नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये दळणवळण बंदी झुगारून मौलवी अन् धर्मांध यांनी नमाजासाठी ५०-६० च्या संख्येने एकत्र येणे, हा त्यातीलच प्रकार आहे.

उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यात दळणवळण बंदी लागू असतांना ३ मशिदींमध्ये गर्दी करून नमाजपठण केले जात असल्याचे चित्र होते. उत्तरप्रदेश पोलिसांनी धडक कारवाई करत या धर्मांधांना दंडुके लगावले. सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १५० धर्मांधांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले. महाराष्ट्रातील इचलकरंजीमध्येही असाच प्रकार घडला. नमाजपठण करण्यासाठी मशिदीमध्ये ५०-६० धर्मांध जमल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; मात्र काही धर्मांधांनी पोलिसांशी हुज्जत घातली. आरडाओरडा करून अन्य धर्मांधांना बोलावले. थोड्याच वेळात मशिदीच्या मागच्या बाजूने धर्मांध महिलांचा जथ्थाही पोलिसांच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करू लागला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक चालू केली. या दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या घायाळ झाला. पुढे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून धर्मांधांवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही नोंदवण्यात आले; पण पुढे काय ? केवळ गुन्हे नोंद झाल्याचे कागदी घोडे धर्मांधांवर वचक निर्माण करू शकत नाही. तसे असते, तर मुंबईमध्ये हैदोस घालणार्‍या रझा अकादमीच्या गुंडांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन केले गेले असते आणि पुढे एकही दंगा धर्मांध करू धजावले नसते; पण तसे झाले नाही. उलट गुन्हेगारीमध्ये धर्मांधांचा भरणा वाढतांनाच दिसून येत आहे.

वास्तविक दळणवळण बंदी काही एकाएकी लागू करण्यात आली नाही. त्याविषयी पुरेशी जनजागृती करण्यात आली होती, तसेच ही बंदी लागू करण्याच्या किमान ८ ते १० दिवस आधीपासून गर्दी न करण्याविषयी जनजागृती करण्यात येत होती. असे असतांनाही मशिदींमध्ये जाऊन नमाजपठण करण्याचा अट्टाहास कशासाठी ? याला अडाणीपणा म्हणायचा, धर्मवेडेपणा म्हणायचा कि समाजद्रोह ? कोरोनाच्या निमित्ताने सरकारी आदेश, नियम आणि सूचना न पाळण्याची धर्मांधांची वृत्ती पुन्हा दिसून येत आहे. त्यावर कठोर उपाय योजणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड येथेही मशिदीमध्ये नमाजपठण करतांना काही विदेशी धर्मांधांचा वावर आढळून आला होता. त्या मशिदीमध्ये जमलेल्या १४ जणांपैकी ९ जण हे विदेशी म्हणजे टांझानिया, इराण आदी देशांतील होते.

धर्मांध महिलांकडून पोलिसांवर दगडफेक !

इचलकरंजीमध्ये पोलिसांची अडवणूक करण्यासाठी थेट दगडफेक करण्यात आली. याचा अर्थ ते धर्मांध सामाजिक शांतता भंग करण्याच्या सिद्धतेतच होते का ? पोलिसांवर दगडफेक करण्यामध्ये येथेही महिलाच आघाडीवर कशा ? कि शाहीन बाग प्रकरणानंतर ही रणनीतीच ठरवली गेली आहे ? मुंबईमध्येही दुचाकीवरून फिरणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी हटकल्यावर पोलिसांशी हुज्जत घालण्यात महिलाच आघाडीवर होती. देशात दळणवळण बंदी असतांना नमाजासाठी जाणूनबुजून एकत्र येणे, हा पराकोटीचा उद्दामपणा आहे. या घटना पाहिल्यावर ‘धर्मांध अनवधानाने नियम मोडत आहेत’, असे कुणीही म्हणू शकत नाही. हे अनावधान नाही, तर षड्यंत्रच असू शकते.

वास्तविक अशा गंभीर घटना घडत असतांना धर्मांधांचे प्रमुख आणि त्यांचे नेते मात्र मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. याचा काय अर्थ घ्यायचा ? ‘धर्म चार भिंतींच्या आत ठेवा’, म्हणून एरव्ही हिंदूंना डोस देणारे पुरो(अधो)गामीही या घटनांच्या संदर्भाने मवाळ आहेत. धर्माचा मोठा पगडा समाजावर असल्याने खरेतर अशांच्या धार्मिक प्रमुखांनी जनप्रबोधन करण्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे; पण दुर्दैवाने अनेक घटनांमध्ये मुल्ला आणि मौलवीच अयोग्य कृतींमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. जर एखादा पंथ समुहाला योग्य दिशा देऊ शकत नसेल, तर त्याला काय म्हणावे ? कोरोनाची साथ पसरल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी हिंदूंनी देवळे बंद केली; पण मशिदी आणि चर्च ही प्रार्थनास्थळे मात्र स्वयंस्फूर्तीने बंद झाल्याचे दिसून आले नाही. हाच धर्माच्या संस्कारांमधील भेद आहे. सुसंस्कृत आणि उन्नत समाज घडण्याच्या ऐवजी प्रार्थनास्थळांमधून हिंसक जमाव निर्माण होत असेल, तर त्याची चिकित्सा व्हायला हवी; पण हिंदूंच्या शास्त्रशुद्ध पद्धतींना ‘अंधश्रद्धा’ म्हणून हिणवणारी मंडळी अन्य पंथियांच्या शिकवणीची चिकित्सा करण्याविषयी मात्र सिद्ध नसतात. या वेळीही हेच दिसून आले.

सरकारने कठोर पावले उचलावीत !

तात्पर्य, कोरोनाचे संकट परतवून लावायचे असेल, तर येथून पुढे काही दिवस समाजातील सर्व घटकांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर कुणी सरकारी नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून समाजाचे आरोग्य संकटात घालत असेल, तर त्यांच्याविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.