३० नोव्हेंबरपर्यंत चूक सुधारणार
नवी देहली – ट्विटरने त्याच्या मानचित्रामध्ये लडाखला चीनचा भूभाग दाखवला होता. या प्रकरणी भारताच्या संसदीय समितीने नोटीस बजावून क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने समितीसमोर लेखी क्षमायाचना केली आहे.
@Twitter apologises in writing for showing #Ladakh in #China, vows to fix the error by 30 November. pic.twitter.com/bVwJm2NOX4
— Oneindia News (@Oneindia) November 19, 2020
संसदीय समिती सभापती मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की, ट्विटरने आश्वासन दिले आहे की, येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत चूक सुधारली जाईल.