केरळ सरकारकडून सामाजिक माध्यमांवरून अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या कायद्याच्या कार्यवाहीला स्थगिती

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ सरकारने केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला मागे घेतले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘सध्या या कायद्याची कार्यवाही करण्यात येणार नाही’, असे म्हटले आहे.

या कायद्यावर अनेक सूचना आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या कलमानुसार सामाजिक माध्यमांवर कोणत्याही व्यक्तीची अपकीर्ती, त्याला दिलेली धमकी आणि त्याचा अपमान करणे, हा दंडनीय गुन्हा असून त्याला ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे अथवा १० सहस्र रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत.