सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांवर बनावट फोलोअर्स वाढवल्याप्रकरणी गायक बादशहा यांची पोलिसांकडून चौकशी

मुंबई – इन्स्टाग्रामवर ६ लाख चाहते असलेले गायक आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया तथा बादशहा यांची ६ ऑगस्ट या दिवशी गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने चौकशी केली. ७ ऑगस्ट या दिवशीही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. बादशहा यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्यांच्या चाहत्यांची संख्या अचानक वाढली आहे.

विज्ञापने मिळवण्यासाठी खोटे चाहते निर्माण करणे, कृत्रिमरित्या चाहत्यांची संख्या वाढवणे असे प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणात काही सोशल मिडिया मार्केटिंग कंपन्या, तसेच चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकार यांचा समावेश असल्याचे अन्वेषणात आढळून आले आहे.