महाराष्ट्रात एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार असल्याने मतदारसंघांत लढती चुरशीच्या होणार ?

महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांना बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. काही जागांवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार उभे राहिल्याने लढत रंजक बनली आहे.

हिंदूंचे मत विभाजन न होण्यासाठी  तिकीट परत केले ! – किशनचंद तनवाणी, महाविकास आघाडी

मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली.

अज्ञातांकडून कोल्हापूर येथे काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. नाव घोषित होताच अज्ञातांकडून काँग्रेसच्या कार्यालयावर कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

आमची उमेदवारांची सूची सिद्ध आहे ! – इम्तियाज जलील, नेते, एम्.आय.एम्.

काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू, असे ते म्हणाले होते; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सगळे संपले आहे. आमचीही सूची सिद्ध आहे, असे विधान पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे.

धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ला पाठिंबा

निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ला पाठिंबा देण्याचा निर्णय ‘सामाजिक सलोखा ऐक्य परिषदे’त घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.

भाजपने मतदारसूचीतून सहस्रावधी नावे वगळली ! – मविआ

१८ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी हा गंभीर आरोप केला.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मनोहर भोईर तळोजा कारागृहात !

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी भोईर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

राजकोट किल्‍ल्‍यावर ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने वातावरण तणावग्रस्‍त

शहरातील राजकोट किल्‍ल्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍यानंतर त्‍यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्‍या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्‍यानिमित्ताने येथे आलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन तेथील स्‍थितीचा आढावा घेतला.