भाजपने मतदारसूचीतून सहस्रावधी नावे वगळली ! – मविआ

१८ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी हा गंभीर आरोप केला.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मनोहर भोईर तळोजा कारागृहात !

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी भोईर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

राजकोट किल्‍ल्‍यावर ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने वातावरण तणावग्रस्‍त

शहरातील राजकोट किल्‍ल्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍यानंतर त्‍यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्‍या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्‍यानिमित्ताने येथे आलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन तेथील स्‍थितीचा आढावा घेतला.

राज्यात ठिकठिकाणी मविआच्या नेत्यांची आंदोलने !

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारला घेरण्याचा उद्देश ! मुंबई, ठाणे, पुणे, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अन्य काही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भर पावसात आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला अनुमती नाकारल्यानंतर राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला. ठाणे येथील गांधी चौकात काँग्रेस … Read more

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला न्यायालयाने अनुमती नाकारली

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची अनुमती नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देऊन २४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे.

२४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा

महिला आणि युवती यांच्यावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांनी या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यास मी पाठिंबा देतो ! – उद्धव ठाकरे

१६ ऑगस्ट या दिवशी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या काळात ४ वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना कारागृहात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती.