प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.

वस्‍त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थान

सर्व शासकीय देवस्‍थानांत वस्‍त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्‍याचा विचार करून योग्‍य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्‍थानच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

वणी येथील सप्‍तशृंगी मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू होण्‍याविषयी १५ जूनला विश्‍वस्‍तांची महत्त्वपूर्ण बैठक !

सद्य:स्‍थितीत वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयीचा ठराव वणी ग्रामपंचायतीकडून मंदिर प्रशासनाकडे सुपुर्द करण्‍यात आला आहे. आता मंदिराचे विश्‍वस्‍त काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर येथील १७ मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृतीनुसार वस्‍त्रसंहिता लागू ! – राजन बुणगे, सदस्‍य, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

दिरांचे पावित्र्य, शिष्‍टाचार, संस्‍कृती जपण्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’च्‍या माध्‍यमातून सोलापूर येथील १७ मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृती अनुरूप वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे,

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !