खालापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

खालापूर – महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात भूमाफियांद्वारे अनधिकृतपणे हडपल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ (भूमी प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, तसेच भूमी हडपणार्यांविरोधी विशेष पथकांची नेमणूक करावी, अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी खालापूर येथील मंदिर विश्वस्त अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले.