मंदिरांच्या शेतभूमी बळकावल्या जाऊ नयेत; म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन
मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे-महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतभूमी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही भूमी खरेदी केल्या होत्या.