पोलीसदलाची प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी सर्वसामान्य पोलीसच खरा कणा !
महाराष्ट्रातात अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाविषयी काही प्रश्नचिन्ह उभे राहिले असले, तरी हे सावट पोलीसदलालाच प्रामाणिकपणे प्रयत्न करून दूर करावे लागेल. तसेच एक-दोन घटनांमुळे पोलीसदलाला सरसकट दोषी ठरवणेही योग्य नाही.