मुंबईच्या धरणांतील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर
मुंबई – शहर आणि उपनगरे यांना पाणीपुरवठा करणार्या ७ धरणांतील पाणीसाठा पाऊस पडत असल्यामुळे ६१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ३ धरणे भरली आहेत, तर तानसा धरणातून पाणी वाहू लागले आहे.
आता ‘बेस्ट’कडे १५० ‘ई-डबलडेकर’ !
मुंबई – येथील उपनगरीय बससेवेत (‘बेस्ट’मध्ये) १५० आरामदायी प्रभारित केलेल्या दुमजली (ई-डबलडेकर) बसगाड्या आल्या आहेत. ३ वर्षांहून अधिक काळ या विद्युत दुमजली बसगाड्यांचे येणे रखडलेले होते. ‘कंत्राटदार हा पुरवठा करण्यास अपयशी ठरत आहे’, असे वाटल्याने बेस्टने हे कंत्राट रहित करण्याचा निर्णय घेतला होता.
समलैंगिक छळाला कंटाळून वरिष्ठ अधिकार्याची हत्या
ठाणे – आस्थापनातील वरिष्ठ अधिकार्याकडून होत असलेल्या समलैंगिक छळाला कंटाळून २ तरुणांनी त्याची हत्या केली. मामनोली परिसरात धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. मृतदेह सापडल्यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी अन्वेषण चालू केले. मृताच्या शर्टवरील अस्थापनाच्या बोधचिन्हावरून त्याची ओळख पटली. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चौकशीतून सौरभ गोल्हे (वय २४ वर्षे) आणि ज्ञानेश्वर कंठे (वय २८ वर्षे) यांच्यावर संशय बळावला. चौकशीत दोघांनी छळाला कंटाळून हत्या केल्याचे सांगितले. न्यायालयाने दोघांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा लाचखोर लिपीक कह्यात !
ठाणे, २२ जुलै (वार्ता.) – एका इमारतीतील चारचाकीचे वाहनतळ तक्रारदाराच्या नावावर करून देण्यासाठी ६ सहस्र रुपयांची लाच घेणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागातील लिपीक सिद्धार्थ रावसाहेब बोराडे (वय ४९ वर्षे) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक) १० सहस्र रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ठरलेली ६ सहस्र रुपयांची रक्कम घेतांना बोराडे याला सापळा रचून कह्यात घेण्यात आले.
चंद्रभागेत बुडणार्या ३ वारकर्यांना वाचवले !
पंढरपूर – नांदेड जिल्ह्यातील सर्वश्री सूरज भारती, गणेश भोकरे आणि सतीश भोकरे असे ३ वारकरी भाविक २१ जुलै या दिवशी चंद्रभागा नदीपात्रात पोहतांना अचानक दम लागल्याने पाण्यात बुडू लागले. नदीपात्रात पहारा देत असलेल्या बचाव पथकातील जवानांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन वारकर्यांना सुखरूप बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर वारकर्यांची प्रकृती स्थिर आहे. वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी नदीपात्रात १७ बोटी, १८० आपदा मित्र, प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत.

काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !