ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले

ठाणे, २२ जुलै (वार्ता.) – शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत भित्तीपत्रके, फलक आणि होर्डिंग्ज यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे. १३ ते २० जुलै या कालावधीत ८ दिवसांत महानगरपालिकेच्या हद्दीतून १ सहस्र ५२४ अनधिकृत विज्ञापने हटवण्यात आली, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात ५ फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तीन हात नाका येथील पादचारी पुलावरील वाढदिवसाचा अनधिकृत फलक कोसळल्यानंतर प्रशासनाने ही मोहीम तीव्र केली. ठाण्यातील अन्य परिसरातही विज्ञापनाचे अनधिकृत फलक हटवण्यात आले आहेत.