१० वर्षांपासून यंत्र वापराविना पडून होते
यंत्र गायब झाल्याच्या समजातून तक्रार प्रविष्ट

पुणे – महापालिकेने १० वर्षांपूर्वी १२ लाख रुपये व्यय करून खरेदी केलेले ‘फूड टेस्टिंग मशिन’ (अन्न पडताळण्याचे यंत्र) गायब झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने जुलै महिन्यातील प्रश्नोत्तरातून दिली होती. त्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही प्रविष्ट केला होता. सखोल पडताळणीनंतर ते यंत्र त्याच प्रयोगशाळेतील दुसर्या एका खोलीमध्ये ‘पॅकबंद’ (जसे आले होते तसेच) अवस्थेत सापडले. (महापालिका मालमत्ता व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार ! या प्रकरणी संबंधित अधिकार्यांवर आयुक्त कारवाई करणार का ? – संपादक)
मुख्य पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या, ‘‘हे यंत्र प्रयोगशाळा चालवणार्या ठेकेदारांच्या कह्यात देण्यात येईल. आता या यंत्राचा वापर पाण्याचे नमुने, शालेय पोषण आहार, तसेच अन्य नमुन्यांची पडताळणी करण्यासाठी केला जाईल.’’
भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी सर्वसाधारण सभेत हे यंत्र कार्यरत आहे का ? तिचे सर्व भाग उपलब्ध आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्ष २०१६-१७ मध्ये ११ लाख ९८ सहस्र रुपये व्यय करून हे यंत्र खरेदी केले होते. ते कोंढवा येथील ‘फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरीज’मध्ये (अन्न स्वच्छता आणि आरोग्य प्रयोगशाळेमध्ये) ठेवले होते.
या प्रयोगशाळेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये तेथील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन पशूवैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आला. त्यानंतर या यंत्राचा वापर करण्यात आला नव्हता.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !