केवळ २ गोदामांकडेच अग्नीशमन विभागाचा परवाना

ठाणे – येथील गावदेवी भाजी मंडईतील भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील अग्नीसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अग्नीसुरक्षेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे येथे नोंद असलेल्या तेलाच्या १९ गोदामांपैकी १६ गोदामे अनधिकृत असून केवळ ३ गोदामांकडे अग्नीशमन विभागाचा वापर परवाना आहे. (कठोर कारवाई होत नसल्यामुळेच अनधिकृत गोदामे थाटण्याचे धाडस होते. याला उत्तरदायी असणार्यांना बडतर्फच करायला हवे. – संपादक) शहरातील शेकडो आस्थापनांपैकी केवळ ३ सभागृहे, १६ निवासगृहे आणि ११३ उपाहारगृह यांकडे अग्नीशमन विभागाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले. कोलबाडमधील निवासी इमारतींच्या मधोमध चालू असलेल्या तेलाच्या गोदामाचे सूत्र नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केले होते. यावर सर्व व्यावसायिक आस्थापनांची अग्नीसुरक्षा पडताळणी चालू असून ‘नियमभंग करणार्यांवर कारवाई केली जाईल’, असे प्रशासनाने सांगितले आहे.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई