स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत ‘एंडोव्हमेंट’ कायदा लागू करून मद्रास प्रांतातील मंदिरांवर एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यात आली. या अन्वये मंदिरांच्या १ लाख एकर भूमीचे अधिग्रहण केले गेले. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे. ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या.