गुंडांसह (बाऊंसरसह) १५० जणांच्या जमावाने केले आक्रमण
२ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ८ गोठ्यांची पूर्ण गोशाळा उद्ध्वस्त
३०० गोवंश बेघर

मडगाव, २२ जुलै (वार्ता.) – ‘ध्यान फाऊंडेशन’ने जांबावली येथील श्री दामोदर मंदिराच्या भूमीत मंदिर व्यवस्थापनाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेऊन उभारलेल्या नवीन गोशाळेवर २१ जुलैच्या मध्यरात्री गुंडांसह (बाऊंसरसह) १५० जणांच्या जमावाने आक्रमण केले. या वेळी २ ‘जेसीबी’ यंत्रांच्या साहाय्याने ८ गोठे उद्ध्वस्त करण्यात आले आणि गोशाळेतील ३०० गोवंश एका रात्रीत भर पावसात बेघर झाला. ‘ध्यान फाऊंडेशन’ने या आक्रमणावरून जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानचे श्री. मंजुनाथ दुकळे, तसेच प्रवास नायक, आक्रमणात सहभागी ‘बाऊंसर’ आणि इतर व्यक्ती यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केपे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत केली आहे. या प्रकरणी केपे पोलिसांनी २२ जुलै या दिवशी सकाळी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. दोषींच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाईल, अशी आशा ‘ध्यान फाऊंडेशन’च्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे. गोशाळेवरील या आक्रमणामुळे राज्यात गोप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
‘ध्यान फाऊंडेशन’ने केपे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत पुढील आरोप केले आहेत.
१. जांबावली येथील श्री दामोदर मंदिर समितीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्यानंतर ‘ध्यान फाऊंडेशन’ संस्थेने संबंधित ठिकाणी २० सहस्र चौ.मी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी गुंतवून गोवंशासाठी निवारा शेडची उभारणी केली. या ठिकाणी अपघातात घायाळ झालेला गोवंश आणून त्यांच्यावर उपचार केले जात होते; मात्र नंतर श्री दामोदर देवस्थानचे श्री. मंजुनाथ दुकळे, तसेच प्रवास नायक यांनी ‘ध्यान फाऊंडेशन’ संस्थेला सातत्याने धमकी देऊन गोशाळा बंद करून भूमी रिक्त करण्यास सांगितले; मात्र याविषयी श्री. मंजुनाथ दुकळे आणि प्रवास नायक यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. संस्थेने अशा धमक्यांविषयी स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रारी नोंदवून सुरक्षा मागवली होती; मात्र पोलिसांनी यावर कोणतीच कृती केली नाही.
२. २१ जुलैच्या रात्री १२.५५ वाजता अनुमाने १५० गुंडांनी (यामध्ये बाऊंसर आणि ३ महिला यांचाही समावेश होता) गोशाळेच्या आवारात अवैधपणे प्रवेश मिळवला. गुंडांच्या हातात लोखंडी सळ्या आणि चॉपर होते. पुरावे राहू नयेत यासाठी गोशाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा नष्ट करण्यात आली. आक्रमणकर्त्यांनी गोशाळेतील पर्यवेक्षक आणि सुरक्षारक्षक यांना २ घंट्यांहून अधिक काळ बंधक बनवून मारहाण केली आणि त्यांचे भ्रमणभाष संच हिसकावून घेऊन ते फोडण्यात आले. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आक्रमणकर्त्यांनी २ ‘जेसीबी’ यंत्रांच्या सहाय्याने ८ गोठे पाडले. या गोठ्यांमध्ये आजारी, गर्भवती आणि लहान वासरांसह अनुमाने ३०० गोवंश होते. काही गुरे पोलिसांनी जप्त मालमत्ता म्हणून संस्थेकडे सोपवली होती, तर बहुतेकांची रस्त्यावरून सुटका करण्यात आली होती.
३. या आक्रमणात काही गोवंश घायाळ झाले आहेत, तर अनेक गोवंश भीतीपोटी जंगलात पळून गेले आहेत. यामुळे काही लहान वासरे आणि त्यांच्या माता बेघर झाल्या आहेत. काही गुरे अद्याप परतलेली नाहीत.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !