परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !

रशियाच्या आक्रमणात ४ भारतीय खलाशांच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण

२२ जुलै २०२६ रोजी मनिला येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांच्यासह भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

मनीला (फिलीपिन्स) – भारताने रशियासमोर युक्रेन युद्ध क्षेत्रात काम करणार्‍या भारतीय खलाशांच्या (नाविकांच्या) सुरक्षेचे सूत्र उपस्थित केले. फिलीपिन्सची राजधानी मनीला येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांच्याशी झालेल्या चर्चेत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतीय खलाशांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि महत्त्वाच्या प्रादेशिक अन् जागतिक घडामोडींवर चर्चा केली. याविषयी डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर माहिती दिली. एका नौकेवर रशियाने केलेल्या आक्रमणात ४ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर ही बैठक झाली आहे.