मुंबई – ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनासाठी काँग्रेसकडून नरिमन पॉईंट येथे भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
‘नीट’ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी ‘कॉकरोच जनता पक्षा’कडून देहली येथील जंतरमंतर मैदानामध्ये आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन, आमदार अस्लम शेख, आमदार भाई जगताप आदी नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काही नेते आणि आंदोलनकर्ते यांना पोलिसांनी कह्यात घेतले.
सरकारला अराजकता माजवू द्यायची आहे का ? असा संशय येत आहे. सरकारच्या तोंडाला फेस आला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. दादरमध्ये विद्यार्थ्यांनी पावसात आंदोलन केले. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संपादकीय : मनसुबे उघड !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !