काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई

 

श्री. अमित साटम

मुंबई – काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी नकारात्मक राजकारण केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था ४ थ्या क्रमांकावरून ३ र्‍या क्रमांवर जाण्याचा प्रयत्न करत असतांना हेतूपूर्वक सरकारला मागे खेचण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी त्यांच्या विदेश दौर्‍यांची माहिती सार्वजनिक करावी, असेही ते या वेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक पक्ष राजकीय पोळी भाजून घेत आहेत. अराजकता कशी निर्माण होईल, याचाही प्रयत्न होत आहे. या आंदोलनाला चेहरा नाही, विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. ते करू. उणिवा दूर होतील. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष यात सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे सरकार घेईल. आपल्या देशाची अपकीर्ती होणार नाही, असा विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

आंदोलनाच्या निधीचा शोध लवकरच ! – रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप

रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप

हे प्रायोजित आंदोलन आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी ८ जणांना अटक झाली आहे. विरोधकांचे लक्ष्य वेगळे आहे. ते संधी पहात आहेत. विदेशी निधी ज्या संघटनांना येत होते, ते केंद्र आणि राज्य सरकारने बंद केले आहेत. विविध देशांमध्ये या आंदोलनात काम करणार्‍या शक्ती कोण आहेत, त्यांना कुठून निधी येत आहे, ते लवकरच समोर येईल.