हिंसाचार करणार्या कॉकरोच जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील लाठीमाराचे प्रकरण
काळे कपडे घालून पोचले काँग्रेस खासदार

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी विरोधी पक्षांनी संसदेत निदर्शने केली. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार काळे कपडे घालून संसदेत पोचले. त्यांनी जंतरमंतर येथे २० जुलैला कॉकरोच जनता पक्षाच्या हिंसाचारी कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचा आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच या विषयावर चर्चेची मागणी केली. लोकसभा आणि राज्यसभा यांचे कामकाज सकाळी ११ वाजता चालू झाले; परंतु गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत केवळ एक मिनिट कामकाज चालले.
Opposition stalls Parliament over the lathi-charge on Cockroach Janata Party workers allegedly involved in violence; both Houses adjourned for hours. Congress MPs protest in black.
Why is Congress silent on those who attacked the police?
During the UPA government, police… pic.twitter.com/wLKUXLqKUu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2026
लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजता पुन्हा चालू झाले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सभागृहात सांगितले की, ‘सरकार चर्चेसाठी सिद्ध आहे. सर्व पक्षनेत्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेतला पाहिजे.’ यावर काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडा म्हणाले की, जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत चर्चा केली जाणार नाही. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस सादर केली. विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि देशाच्या परीक्षा पद्धतीवर चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात या विषयांवर तातडीने चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अमेरिका, ब्रिटन अन् आयर्लंड येथे निदर्शने
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या कथित अधिकारांसाठी अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंड येथे तेथील भारतीय समुदायाकडून निदर्शने केली जात आहेत. अमेरिकेतील ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक युनियन स्क्वेअर येथील म. गांधी यांच्या पुतळ्याजवळ आणि कॅलिफोर्नियातील सॅन होजे शहरात निदर्शने करण्यात आली.
लंडनमधील भारतीय उच्चायोग आणि आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील भारतीय दूतावासाबाहेरही नागरिकांनी एकत्र येत मूक आंदोलनाद्वारे निषेध नोंदवला.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
संपादकीय : मनसुबे उघड !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !